पोलीस असल्याची बतावणी करून पाच लाख उकळले

पोलीस असल्याची बतावणीकरून तसेच तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याची खोटे माहिती देऊन एका तोतया पोलिसाने व्यावसायिकाकडून तब्बल ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे :  पोलीस असल्याची बतावणीकरून तसेच तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याची खोटे माहिती देऊन एका तोतया पोलिसाने व्यावसायिकाकडून तब्बल ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मधुकर विलास सापळे (वय ३२, आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय गुलाबराव भोसले (वय ३३) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदारांना पोलीस असल्याची बतावणीकरून त्यांना वेगवेगळ्या गुन्हा कोर्टात केसेस सुरू आहेत व आणखी गुन्हे दाखल करण्याची खोटी भीती दाखवली. तसेच सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल पाच लाख ५ हजार रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. पुढील तपास पोलीस करत आहेत.