मुंबईत 5 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय संख्या 61 वर

मुंबईत शुक्रवारी कोरोनाच्या नव्या पाच रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 11,54,977 झाली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची माहिती आहे. मुंबईत शुक्रवारी कोरोनाच्या नव्या पाच रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 11,54,977 झाली आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अधिकाऱ्याने  दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनातून बरे झालेल्यांची संख्य 11,35,172 वर पोहोचली आहे. आणि  तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 61 वर आली आहे. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1,26,927 दिवसांवर आली आहे. 2 ते 8 डिसेंबर दरम्यान केसांचा एकूण वाढीचा दर 0.001 टक्के होता. दरम्यान, कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.3 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 2,244 कोरोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 1,85,85,247 आहे.