कपडे धुवायला गेलेल्या ५ महिलांचा तलावात बुडून मृत्यू; एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश

लातूर जिल्ह्यातील किनगाव गावाजवळील तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला कपडे धुण्यासाठी गेल्याची माहिती मिळत आहे. 

    लातूर : लातूर जिल्ह्यातील किनगाव गावाजवळील तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला कपडे धुण्यासाठी गेल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान या घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे ही घटना घडली आहे.

    यातील काही मजूर अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर साखर कारखाना येथे ऊसतोडीसाठी आले होते. त्यातील पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील सुषमा संजय राठोड, अरुणा गंगाधर राठोड तर याच तालुक्यातील रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडिबा आडे आणि त्यांच्या मुली काजल धोंडिबा आडे आणि दीक्षा धोंडिबा आडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी किनागाव पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.