Constitution Honor Run 2023

  पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नाेव्हेंबर राेजी आयाेजित ‘संविधान सन्मान दौड 2023’ मध्ये पन्नासहून अधिक देशातील विद्यार्थ्यांसह पाच हजार स्पर्धक सहभागी हाेणार आहे. या स्पर्धेच्या जर्सीचे आज अनावरण केले गेले.

  पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा आयाेजित केली आहे.

  या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी हाेणार

  मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी हाेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी  सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे विभाग  प्रमुख डॉ. विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( बार्टी ) च्या कार्यालयीन अधीक्षक डॉ. संध्या नारखेडे, प्रा. विजय बेंगाळे, राहुल डंबाळे, दीपक म्हस्के  यांच्या हस्ते स्पर्धेच्या ‘जर्सी’चे अनावरण केले गेले.

  चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

  26 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान दौडची सुरुवात सकाळी 5.30 वा. सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार अाहे. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचली जाईल. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अभय छाजेड, राजेश पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  दरम्यान, स्पर्धेच्या निमित्ताने ‘आयर्नमॅन’चा दोन वेळा किताब मिळवणारे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा विशेष सन्मान होणार आहे. पुण्यातील 5 आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.