हरवलेले ५१ मोबाईल पोलिसांनी शोधले; शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

पुणेकरांचे (Pune) हरवलेले महागडे तब्बल ५१ मोबाईल (Mobile) पोलिसांना (Police) शोधण्यात यश आले असून, शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल विविध राज्यातून व शहरातून शोधून मुळ तक्रारदारांना परत केले आहेत.

  पुणे : पुणेकरांचे (Pune) हरवलेले महागडे तब्बल ५१ मोबाईल (Mobile) पोलिसांना (Police) शोधण्यात यश आले असून, शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल विविध राज्यातून व शहरातून शोधून मुळ तक्रारदारांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.

  पुणेकरांनी हरवलेल्या मोबाईलबाबत नागरिकांनी पुणे पोलिसांच्या वेबसाईटला व शासनाच्या सेंटर इक्युपमेंट आयडेंटी रजिस्टर (CEIR) या वेबसाईटला नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली असून, त्यांच्याकडून संबंधितांना हे मोबाईल परत करण्यात आले आहेत.

  परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल्ल, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रूपेश वाघमारे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, अर्जुन कुडाळकर, रूचिका जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

  शहरातील मोबाईल चोरी तसेच हिसकावण्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. यासोबतच पुणेकरांकडून मोबाईल घाळ होण्याचे व हरविण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. पोलिसांकडून चोरी झाल्या मोबाईलचा शोध घेतला जातो. पण, हरवलेला मोबाईल शोधण्यात उदासीनता असते. दरम्यान, प्रत्यक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोबाईलचा शोध घेण्यात येत असून, स्थानिक पोलिसांना त्यात मोठे यश येत असल्याचे दिसत आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हे मोबाईल शोधले आहेत.

  गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पंश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि राज्यातील विविध शहरातून जप्त् केले आहेत. तांत्रिक तपासात हे मोबाईल संबंधित राज्यात वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी ते जप्त केले आहेत.

  त्या-त्या भाषेत पुणे पोलिसांचा संपर्क …

  शिवाजीनगर पोलिसांनी वेगवेगळ्या ८ राज्यातून हे मोबाईल परत मिळविले आहेत. त्यासाठी पोलिसांनी संबंधित व्यक्ती व पोलिसांशी संपर्क साधला. त्यासाठी पोलिसांनी कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी भाषांत संपर्क साधून त्यांना मोबाईलची माहिती दिली व ते मोबाईल मिळविले आहेत. पोलिसांनी ९ लाख ५० हजार रुपयांचे ५१ महागडे मोबाईल मिळविले आहेत.