fraud

साडेतीन एकर जमीनीची विक्री करून देतो असे सांगून खरेदीदार शिक्षकाची ५२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद समजाकल्याण विभागाचे माजी सभापती दयानंद लोंढे व त्यांचा मुलगा प्रशांत लोंढे या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद झाकीर गुलामअली शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिली.

    बारामती : साडेतीन एकर जमीनीची विक्री करून देतो असे सांगून खरेदीदार शिक्षकाची ५२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद समजाकल्याण विभागाचे माजी सभापती दयानंद लोंढे व त्यांचा मुलगा प्रशांत लोंढे या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद झाकीर गुलामअली शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिली.

    याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २५ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता ते आज पर्यंत कसबा बारामती येथे फिर्यादी झाकीर शेख यांच्या घरी व बारामती मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेख यांच्याकडून प्रशांत दयांनद लोढे व दयानंद संभाजी लोंढे (दोन्ही रा. मळद ता. बारामती) यांनी प्रशांत दयांनद लोंढे याच्या नावे असलेले मळद (ता. बारामती) गावच्या हददीतील जमीन गट नंबर ७० मधील साडेतीन एकर जमीन ६७ लाख ५० हजार रुपये किंमतीला खरेदी खत करून देतो, असे म्हणून तसे दि. २३ जून २०२० रोजी साठे खत करून देवून शेख यांच्या कडून वेळोवेळी चेकने व रोख रक्कम असे एकून ५२ लाख ६० हजार रुपये घेतले.

     शेख यांना जमीन खरेदी करून दिली नाही. शेख यांनी जमीनीचे खरेदी खत करून दया, अथवा माझे पैसे परत दया ,असे म्हणाले असता, जमीन ही खरेदी न देता व पैस ही परत न करून त्यांची फसवणुक केली आहे . जमीन खरेदी करून दया अथवा माझे घेतलेले पैसे परत देण्याची त्यांच्याकडे मागणी केली असता त्याने शेख यांना शिवीगाळ व दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर बारामती शहर पोलिसात प्रशांत दयानंद लोंढे व त्याचे वडील दयानंद संभाजी लोंढे या दोघा-पिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेकेकरत आहेत.