55 lakh fraud of businessman; A case of fraud has been registered against the three

    पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाला अ‍ॅल्युमिनीअम स्क्रॅपविक्री करण्याच्या बहाण्याने ५५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी मोहम्मदवाडी हडपसर येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रणजीत कृपलाणी, रणजीत पटेल आणि गाडीचा चालक, विविध बँक खातेधारक यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ जानेवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली आहे.

    विश्वास संपादन करून केली फसवणूक

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपींचा व्हॉटस्अ‍ॅपद्वारे संपर्क झाला होता. आरोपींनी त्यांना अ‍ॅल्युमिनियम स्क्रॅप विक्रीस असल्याचे सांगितले. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील पाठवले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना इन्व्हाईस पाठवून मटेरिअल लोडिंग करण्याची डिल केली. दरम्यान, त्यांनी माल लोडींग करीत असल्याचा व्हिडीओ आरोपींना पाठविण्यास सांगितला तेव्हा, त्याला नकार देऊन व्यवहार सोडून देण्यास सांगितले. आरोपींनी म्हणाले की, तुमचा व्यवहार झाला असून,मी सॉल्व करतो आहे.

    ५५ लाख रुपये आरोपींनी उकळले

    माल लोड केलेला ट्रक आणि चालक आपलेच आहेत, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर चांगले मटेरियल गॅरंटीसह देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी तब्बल ५५ लाख रुपये आरोपींनी उकळले. त्यानंतर त्यांना कोणता माल देण्यात आला व त्यांचे पैसे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.