Ashti police station files fraud case against three

    पुणे : पीएमआरडीएचे खोटे व दिशाभूल करणारे भोगवटा प्रमाणपत्र तयार करून एकाची ५७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर शासनाचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांवर सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते आजपर्य़ंत धनकवडी येथील औदुंबर हाईट्स येथे घडला आहे.

    यांच्यावर गुन्हा दाखल

    याबाबत मुक्तेश्वर बाबासाहेब जाधव (वय-66, रा. चैतन्य सोसायटी, धनकवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून रमेश नगरकर व अमोल नगरकर (दोघे रा. स्वामी गणेश व्हिला, जाधवनगर, वडगाव बु) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पीएमआरडीएचे भोगवटा प्रमाणपत्र

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार यांना औदुंबर हाईट्स येथील एक दुकान व दोन फ्लॅट विकत देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, मिळकतीचे बोगस पीएमआरडीएचे भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवले. नगरकर यांनी तक्रारदार जाधव यांना एका गाळ्याचे खरेदी खत करून दिले. तर एका फ्लॅटची विसार पावती तयार करुन व एका फ्लॅटबाबत नोटराईज करारनामा करून दिला. त्यांच्याकडून चेकद्वारे तसेच ऑनलाईन विष्णुप्रिया प्रमोटर्स अँड बिल्डर्स नावाने ५७ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंर आरोपींनी फ्लॅट न देता असाराम त्रिभुवन यांना विकून त्यांची व शासनाची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत.