भाळवणी सोसायटीत ५९ लाखांचा अपहार ; माजी सरपंच महेश घोरपडे यांचा आरोप

भाळवणी (ता. खानापूर) येथील भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटी मध्ये ५९ लाख रूपयांचा अपहार झाला आहे. असा आरोप माजी सरपंच महेश घोरपडे यांनी केला. संस्थेच्या कामकाजाची सहाय्यक निबंधक मार्फत चौकशी व्हावी, संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटी मध्ये ५९ लाख रूपयांचा अपहार झाला आहे. असा आरोप माजी सरपंच महेश घोरपडे यांनी केला. संस्थेच्या कामकाजाची सहाय्यक निबंधक मार्फत चौकशी व्हावी, संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
    घोरपडे म्हणाले, भाळवणी सोसायटीत ५९ लाखांचा अपहार झाला आहे. सोसायटीतर्फे असलेल्या खत विभागमध्ये अपहार झाला आहे. खत सेंटर सेल्समन २५ लाख रूपये घेऊन पालायन केले आहे. हे गंभीर आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेस सरपंच आनंदराव आदाटे, उपसरपंच अन्सार मुल्ला, किसनराव निकम, मनोहर नलवडे, अॅड. मुसा मुजावर, शशिकांत आदाटे, सलील संदे, राजेंद्र शिंदे, रामचंद्र शिंदे, धनाजी शिंदे, धनाजी पाटील, युवराज धनवडे, संजय धनवडे, मोहन धनवडे उपस्थित होते.‌

    सहाय्यक निबंधकांमार्फत चौकशी व्हावी
    पंचलिंगनगरचे सरपंच संग्राम नलवडे म्हणाले, सोसायटीचे कामकाज आदर्शवत होते. संस्थेच्या वतीने ऊसतोड मशीन घेण्यात आली. ऊसतोडीची समस्या कायमची संपावी. यासाठी मशीन‌ घेतले.‌ परंतु, सध्या ही मशीन‌ कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडी साठी आहे. सभासदांचा ऊस तोड शिल्लक ठेऊन इतर ठिकाणी ऊसतोड केली जाते. ‘सोनहिरा’चे संचालक सयाजी धनवडे म्हणाले, भाळवणी सोसायटीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. त्यांची चौकशी सहाय्यक निबंधकांमार्फत चौकशी व्हावी. दोषींच्यावर कारवाई करावी.