55 lakh fraud of businessman; A case of fraud has been registered against the three

    पिंपरी : कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 6 कोटी 65 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनीचे दोन मालक आणि दोन एजंट अशा चौघांच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे घडला.

    सुनील बगाराम जाधव (34, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अंकुशरावचव्हाण (रा. निगडी), संकेत भागवत (रा. दापोडी), दिपक शिंदे (रा. चऱ्होली), एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि महिला हे ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीचे मालक आहेत. संकेत आणिदिपक हे या कंपनीचे एजंट आहेत. या चौघांनीही संगनमत करून फिर्यादीला व इतर गुंतवणूकदारांना कंपनीत पैसे गुंतवल्यास जादापरतावा देण्याचे आमिष दाखवले.

    त्यानुसार फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी कंपनीत 6 कोटी 65 लाख 34 हजार 310 रुपये गुंतवले. आरोपींनी हे पैसे परत न देताअपहार करत फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.