6 injured in car crash under bridge due to lack of radium or directional sign

आर्वी- वर्धा रोडचे नवीन झालेल्या कामामुळे सुसाट गाड्या धावतात. पण काही ठिकाणी काम सुरू असल्याने आणि या पुलावर कोणत्याही प्रकारचे रेडियम अथवा कुठलेच दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले नसल्यामुळे, आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झालेले आहेत.

    आर्वी : चंद्रपूरवरून आर्वीमार्गे मोझरीला येत असलेली कार सावळापूर समोरील पिंझारा शिवारात रात्री १ च्या सुमारास पुलाच्या खाली  कोसळली. त्या अपघातात सहा जण जखमी झाले. या जखमीमध्ये ६ वर्षीय मुलींचा समावेश असून पुढील उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर येथून आर्वी मार्गे मोझरीला  कार क्र. एमएच ३४ बीव्ही ७८६९ वाढोणा घाटातून आर्वीकडे येत होते. दरम्यान सावळापूर नजीक असलेल्या पुलावरून कार अनियंत्रित होवून खाली कोसळली. कारमध्ये असलेले  विवेक बुटले (६०), रिया विवेक बुटले( २५), सुनील हरिदास राळे (४७), परमेश्वरी सुनिल राळे( ४२) आर्य सुनील राळे( ६ )सुनीता विवेक बुटले (५०) आदी जखमी झाले.

    अपघाताची माहिती मिळताच तात्काळ त्यांच्या सहका-यांनी अडकलेल्या प्रवाशांना गाडीच्या बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिका बोलावून आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. जखमींवर प्रारंभिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचा मार्गदर्शनात जमादार पालसाहेब जाधव, शिपाई आकाश चोरपगार  पुढील तपास करीत  करीत आहे

    दिशादर्शक बोर्ड दुर्लक्ष

    आर्वी- वर्धा रोडचे नवीन झालेल्या कामामुळे सुसाट गाड्या धावतात. पण काही ठिकाणी काम  सुरू असल्याने आणि या पुलावर कोणत्याही प्रकारचे रेडियम अथवा कुठलेच दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले नसल्यामुळे, आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झालेले आहेत. पूलापूर्वी वळण रस्ता व घाट असल्यामुळे नवीन वाहनचालकांना या पुलाचा अंदाज येत नाही. त्यामुळे  सतत अपघात होत असतात.