55 lakh fraud of businessman; A case of fraud has been registered against the three

    पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे मार्गी लावून देण्याच्या आमिषाने सहा जणांना साडेसात लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिलिंद मधुकर भोकरे (रा. स्वारगेट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवराज भिवाजी टकले (वय ४२, रा. रोहन अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.

    आरटीओतील काम करून देण्याचे आमिष

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले यांनी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोटार खासगी वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दिला होता. त्यावेळी आरटीओतील काम करून देण्याचे आमिष भोकरे याने त्यांना दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रे घेतली.

    आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस

    त्यानंतर भोकरे याने टकले यांचे काम करून दिले नाही. पैसे परत करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, भोकरे याने अशाच पद्धतीने आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. भोकरेने टकले यांच्यासह पाच जणांची ७ लाख ४३ हजार ५५० रुपयांची फसवणूक केली असून, पोलीस उपनिरीक्षक नळकांडे तपास करत आहेत.