अनिल कदम यांना ६ जागा ; पिंपळगाव बाजार समिती आ. बनकरांच्या हाती

    पिंपळगाव ब. :  पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत अटीतटीची लढत पहायला मिळाली. आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास गटाला अकरा तर माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन गटाला सहा जागा तर यतीन कदम हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.
    पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल मत मोजणीनंतर लागला असून, माजी सभापती व विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनल ११जागांवर तर माजी आमदार अनिल कदम यांना ६ जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्ष उमेदवार यतीन कदम विजयी झाले. आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी गटातील विजय झालेले उमेदवार स्वतः आमदार दिलीप बनकर ५५३, दीपक बोरसे ४४८ रामभाऊ मारुती ४४१ ज्ञानेश्वर शिरसाठ ४७४ मतांनी विजयी झाले तर अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलमधून आमदार अनिल कदम ४७७ मते दो.प्रल्हाद डेर्ले ४२५ आणि गोकुळ गिते ४७३ मते मिळवून विजयी झाले.

    या गटात एकूण ८६८ मतदान झाले. त्यापैकी ५३ मते अवैध ठरली. सोसायटी गटात दिलीप बनकरांनी चार जागा तर अनिल कदम तीन जागांवर आपले उमेदवार विजयी केले. तर शेतकरी विकासचे भाऊसाहेब घोलप ३४४ नंदकुमार सांगळे यांना ३६७ बबन जगताप यांना ३७३ मध्ये मिळून पराभूत झाले. लोकमान्य परिवर्तनचे प्रभाकर कुयटे ४२२ , बाबाजी कुशारे ३७७ दौलतराव कडलग ३८९ मते मिळवून पराभूत झाले.या गटात ८६८ मतदान झाले. त्यापैकी ५३ मते अवैध ठरली. महिला राखीव जागावर लोकमान्य परिवर्तनच्या अमृता वसंतराव पवार ५१९ मते मिळून विजय झाल्या. तर त्यांच्या सहकारी नीता भुसारे ३८१ मते मिळून पराभूत झाल्या. शेतकरी विकासच्या मनीषा खालकर ४५५मते मिळून विजय झाल्या. तर त्यांच्या सहकारी मनीषा शिंदे २३३मते मिळवून पराभूत झाल्या. या गटात ९०८ मतदान झाले त्यापैकी १३ मध्ये अवैध ठरले. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून शेतकरी विकासचे जगन्नाथ कुटे ४८२ मते मिळून विजय झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी लोकमान्य परिवर्तनचे भगवान सानप ४२२ मते मिळून पराभूत झाले. या गटात ९०४ मतदान झाले तर १७ मते अवैध ठरली गेली. ग्रामपालिका मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी अपक्ष उमेदवार यतीन कदम २८८ मते व शेतकरी विकासचे शिरीष गडाख २३१ मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे सहकारी सुभाष हो होळकर १७५मते मिळून पराभूत झाले. त्याचप्रमाणे लोकमान्य परिवर्तनचे भास्कर बनकर २२८ मते व त्यांचे सहकारी संदीप गडाख २१९ मते मिळवून पराभूत झाले. या गटात भास्करराव बनकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या गटात एकूण ५८८ मतदान झाले असून ६३ मते अवैध झाली.अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी विकास चे महेंद्र गांगुर्डे ३१५ मध्ये मिळून विजय झाले तर प्रतिस्पर्धी लोकमान्य परिवर्तनचे किरण निरभवणे २८६ मते म्हणून पराभूत झाले.

    या गटात एकूण मतदान ६०१ झाले असून ५० मतपत्रिका बाद ठरल्या .ग्रामपालिका आर्थिक दुर्बल गटात लोकमान्य परिवर्तन चे राजेश पाटील ३१९ मध्ये मिळून विजय झाले तर शेतकरी विकास चे शरद काळे २८६ मते मिळून पराभूत झाले. या गटात ६०५ मतदान झाले त्यापैकी ४६ मते बाद ठरली. व्यापारी मतदारसंघातून शेतकरी विकासचे सोहनलाल भंडारी ४२९ मते व शंकरलाल ठक्कर ३८२ मते मिळवून विजयी झाले. तर लोकमान्य परिवर्तनचे योगेश ठक्कर २२५ मते व अतुल शहा २५८ मते मिळून पराभूत झाले. या गटात एकूण मतदान ६५४ झाले तर ७ मते बाद ठरली. हमाल तोलारी मतदारसंघातून शेतकरी विकतचे नारायण पोटे २२१ मध्ये विजय झाले तर लोकमान्य परिवर्तनचे दीपक मोरे १३८ मते मिळून पराभूत झाले. या गटात ३४९ मतदान झाले असून त्यापैकी २१ मते बाद ठरली. मतमोजणी वेळी दोन गटातील कार्यकत्यांची काहीशी बाचाबाची झाली. ते सोडता मतमोजणी अत्यंत शांततेत पार पडली. मतमोजणी सुरळीत व शांततेत झाली. यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार,व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.