उस्मानाबादेत ६ वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार

तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय सरायात गुन्हेगाराकडून पाशवी बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर बलात्कार करून मुलीच्या गुप्तागांवर वारही केल्यांची समोर आले आहे.

    उस्मानाबाद – जिल्ह्यात अवघ्या ६ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर नराधमाने तिच्या गुप्तांगावर अमानूष वार केल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती गंभीर आहे. या संशयित आरोपी हा ४ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य केले. त्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

    तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय सरायात गुन्हेगाराकडून पाशवी बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर बलात्कार करून मुलीच्या गुप्तागांवर वारही केल्यांची समोर आले आहे. यात मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शेतात काम करणाऱ्या महिलांना मुलीचा आक्रोश ऐकू आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या सराईत गुन्हेगाराला ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

    घराशेजारी शौचास गेलेल्या सहावर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (३० ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या वेळी सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या नराधमाला ग्रामस्थांनी पकडून चोप दिला. दरम्यान, गंभीर जखमी मुलीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.