निवडणुकीत ६० हजार एसटी कर्मचारी राहणार मतदानापासून वंचीत!

एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक ही पगारदार आणि नोकरदाच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जाते. सध्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकच्या राज्यभरात ५० शाखा आहेत तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहे. ८१ हजार ३०२ एसटी कर्मचारी एसटी बँकेचे सभासद आहे. एसटी कर्मचार्‍यांचे बहुतांशी व्यवहार या बँकेतून चालतात.

    मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांना संप तब्बल सहा महिन्यानंतर संप मिटला असून आता त्यांचे परिणाम दिसू लागले आहे. येऊ घातलेल्या एसटी बँकेचा निवडणुकीवर संपाचा मोठा परिणाम झाला आहे. स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के कर्मचारी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील तीन महिन्यापासून कर्जाचे हप्ता न भरल्याने या सदस्यांना एसटी बँकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.

    एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक ही पगारदार आणि नोकरदाच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जाते. सध्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकच्या राज्यभरात ५० शाखा आहेत तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहे. ८१ हजार ३०२ एसटी कर्मचारी एसटी बँकेचे सभासद आहे. एसटी कर्मचार्‍यांचे बहुतांशी व्यवहार या बँकेतून चालतात. एसटी बँकेत दोन हजार २०० रुपयांची ठेवी आहे. एक हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज वाटले आहे. बँकेचा एकूण सदस्यांपैकी ७५ टक्के सदस्यांनी एसटी बँकेचे कर्ज घेतले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी संपा असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झाले नव्हते. परिणामी त्यांना कर्जाचे हप्ते फेडणे शक्य झाले नाही. परिणामी कर्जाचे हप्ते न फेडणाऱ्या बँक सदस्यांना एसटी बँकेने डिफ़ॉर्ल्टर यादीत टाकले आहे.