
पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील रिक्त असलेल्या 69 गावातील पोलीस पाटील पदाच्या भरतीची गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे
पंढरपूर : पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील रिक्त असलेल्या 69 गावातील पोलीस पाटील पदाच्या भरतीची गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे .
सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील पदाच्या आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, संबंधित गावचे ग्रामस्थ तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-
पंढरपूर तालुका अनुसूचित जाती – उंबरगाव, तरडगाव भोसे, अनुसूचित जमाती- आंबे (महिला) शिरढोण (महिला), रोपळे (महिला), शंकरगांव, बादलकोट, तारापूर, नारायण चिंचोली, भंडीशेगांव, भटक्या जमाती (ब)-सर कोली (महिला) जळोली, उंबरे, भटक्या जमाती (ड)-गादेगांव (महिला), गोपाळपूर, गुरसाळे, इतर मागास प्रवर्ग- शिरगाव ओझेवाडी, केसकरवाडी पांढरेवाडी खेड भाळवणी.तर अराखीव मध्ये भोसे(महिला)रानजणी, धोंडे वाडी, सुपली, नांदोरे, कान्हापुरी.
मोहोळ तालुका- अनुसूचित जाती- यावली (महिला), अनुसूचित जमाती मिरी (महिला), तरडगाव वाघोलीवाडी, पासलेवाडी, विशेष मागास प्रवर्ग- जामगाव बु., विमुक्त जाती (अ)- अर्धनारी (महिला), कोरवली, भटक्या जमाती (ब)- कोळेगाव, भटक्या जमाती (ड)- देवडी, इतर मागास प्रवर्ग- तांबोळे (महिला) नांदगाव (महिला) , बिटले (महिला), वाफळे (महिला), सौंदणे तेलंगवाडी, टाकळी सि., वडदेगांव, शेटफळ, खंडाळी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक- आढेगाव, परमेश्वर पिंपरी,तर अराखीव बैरागवाडी (महिला) शिरपूर सो.(महिला), अर्जुनसोड (महिला),पवारवाडी (महिला) घोरपडी ( महिला) वटवटे(महिला), नालबंद वाडी, कुरणवाडी, कुरणवाडी आष्टी, एकुरके, खवणी, घोडेश्वर, भांबे वाडी, कुरुल, सारोळे, बोपले, कोन्हेरी, मलिकपेठ, गलंड वाडी, दाईंगवाडी.
जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा 21 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय, या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष गजानन गुरव यांनी सांगितले आहे.