7 accused abduct youth with pistol and knife, one accused arrested

काही दिवसांपूर्वी आरोपी शेख इरफान उर्फ बाली अंगारी याच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी आरोपी शेख इरफानने त्याचे साथीदार शेख मुन्नु, शेख अलीम, शेख सलीम, शेख फईम उर्फ लंगडा, शेख इरफान उर्फ बाली तसेच तौसीफ उर्फ लिटिल नासीर घोडा यांच्या मदतीने पिस्तूल व चाकूच्या धाकावर शेख तौफीकचे पांढरी हनुमान मंदिराजवळून अपहरण केले.

    अमरावती : पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर ७ आरोपींनी पिस्तुल आणि चाकूच्या धाकावर शुक्रवारी भरदिवसा एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी हनुमान मंदिर येथे घडली. या प्रकरणी तक्रारीच्या आधारावर गाडगेनगर पोलिसांनी शेख मुन्नू शेख सलीमसह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी शेख इरफान उर्फ बाली (गवळीपुरा) याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

    या प्रकरणी बिस्मिल्ला नगर येथील रहिवासी शेख तौफिक शेख मुश्ताक यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी आरोपी शेख इरफान उर्फ बाली अंगारी याच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी आरोपी शेख इरफानने त्याचे साथीदार शेख मुन्नु, शेख अलीम, शेख सलीम, शेख फईम उर्फ लंगडा, शेख इरफान उर्फ बाली तसेच तौसीफ उर्फ लिटिल नासीर घोडा यांच्या मदतीने पिस्तूल व चाकूच्या धाकावर शेख तौफीकचे पांढरी हनुमान मंदिराजवळून अपहरण केले.

     बडनेरा येथे ठेवले पोलीस

    अपहरणानंतर बडनेराच्या जुनी वस्तीत शेख तौफिकला नेण्यात आले. येथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझे कुटुंब उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली. शुक्रवारी शेख तौफिक कसा तरी आरोपींच्या तावडीतून सुटला आणि थेट गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. येथे घडलेला घटनाक्रम सांगितल्यावर पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान उर्फ बालीला अटक केली, तर अन्य सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.