ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी ७० अर्ज

तालुक्यातील २६ ग्रामपंचायती आणि २४ गावांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५५ व रिक्त जागांसाठी ३ असे एकूण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.

    पाटण : तालुक्यातील २६ ग्रामपंचायती आणि २४ गावांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५५ व रिक्त जागांसाठी ३ असे एकूण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.

    बुधवारी मंद्रुळकोळे सरपंच पदासाठी ३ व सदस्य पदासाठी १७, बेलवडे खुर्द सरपंचसाठी ३ व सदस्य पदासाठी ६, उधवणे सदस्य पदासाठी ४, शितपवाडी सरपंचसाठी २ व सदस्यसाठी ६, जिंती सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी २, मंदुळकोळे खुर्द सरपंच पदासाठी २ व सदस्य पदासाठी १०, गाडखोप सदस्य पदासाठी ३, मल्हारपेठ सदस्य पदासाठी ३, नारळवाडी सदस्य पदासाठी २, डावरी सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी २, नवसरवाडी सदस्य पदासाठी ३ असे सरपंच पदासाठी १२ व सदस्य पदांसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर पोटनिवडणुकीसाठी असवलेवाडी २, चाफोली १ असे ३ उमेदवारी अर्ज असे एकूण ७० अर्ज दाखल झाले. या निवणुकीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
    तालुक्यातील २६ ग्रामपंचायती आणि २४ गावांच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. राज्य उत्पादनशुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाचे कार्यकर्ते ताकद पणाला लावून निवडणुकीत रंगत आणत असतात. त्यामुळेच जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवणुकीत कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.