70 lakh fraud in Pune by investment lure, read detailed report

  पुणे : फळ व्यवसायाच्या नावाने फर्म काढून त्यात गुंतवणूक केल्यास ८ ते ९ टक्के दराने परतावा देण्याच्या आमिषाने सहा जणांची ७० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल रुमान एंटर प्रायझेस नावाचे ही फर्म काढण्यात आले होते.

  याप्रकरणी सलमान ईम्तीयाज शिरोळकर (वय ४०, रा.कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलीम कासम शेख (वय ६९, रा.कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २८ जुलै २०२१ ते एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे.

  कंपनीत पैसे गुतंवल्यास महिना ८ ते ९ टक्के परतावा

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सलीम हे सलमान शिरोळकर याच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांना सलमान याने फळ व्यवसायाच्या “अल रुमान एंटर प्रायझेस” या कंपनीत पैसे गुतंवल्यास महिना ८ ते ९ टक्के परतावा देतो असे सांगितले. त्याबाबत करारनामा करुन त्यांचा विश्वास संपादन केला.

  सदर पैसे देण्यास टाळाटाळ

  त्यानंतर तक्रारदारांकडून २८ लाख रुपये घेतले. याप्रकारे त्याने मोहम्मद नूर अहेमद मेमन यांच्याकडून ३ लाख, असिफ शेख पठाण यांच्याकडून साडेचार लाख, तस्लीम शेख यांच्याकडून ७ लाख, शेख रेश्मा उमर यांच्याकडून ३ लाख रुपये तर आयेशा आली याकुब यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. परंतु त्याबदल्यात कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुंतवणूक केलेले पैसे आरोपींकडे मागितल्यावर त्याने सदर पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

  टास्कच्या बहाण्याने पावणेचार लाखांचा गंडा
  हडपसरमधील अ‍ॅमनोरा पार्क येथे राहणार्‍या पवन कामशेट्टी (वय २२) या तरुणाला अज्ञातांनी टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक साधत त्याला पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून तीन लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. त्याला टास्कचे अमिष दाखवत विश्वास संपादन केला. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

  तरुणाची १८ लाखांची फसवणूक

  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी १८ लाख ५४ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने येरवडा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार फेसबुक पाहत असताना त्यांना एक जाहिरात पाहिली. त्यांनी संपर्क साधल्यानंतर त्याला ब्लॅक रॉक स्टॉक पुलप ग्रुपमध्ये अड केले. यानंतर आयआयएफएल एसडीआय हे अप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरुणाने अप डाऊनलोड केल्यानंतर त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत