लवकरच ग्रामीण भागात लालपरी सुरळीत धावणार, चोपडा एसटी आगारात ७० टक्के कर्मचारी हजर

परंतु आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर चोपडा आगारात जवळपास ७० टक्के कर्मचारी हजर झाले असल्याने १७००० किलोमीटर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

    जळगाव :  गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनात एसटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने राज्यातील संपूर्ण एसटी बस आगारात थांबून होत्या. परंतु कालांतराने काही कर्मचारी हजर झाल्याने राज्याची लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे.

    परंतु आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर चोपडा आगारात जवळपास ७० टक्के कर्मचारी हजर झाले असल्याने १७००० किलोमीटर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यात लांब पल्ल्याचे मध्यम पल्ला आँडनेरीचे फेऱ्या सुरू आहे. लवकरच ग्रामीण भागात फेऱ्या सुरू करू तसेच, विद्यार्थ्यांच्या फेऱ्या, ग्रामीण भागाचे मुक्काम सर्व फेऱ्या २२ तारखेच्या आत सुरू करणार असल्याचे चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी सांगितले.