देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी रेल्वे थांबवत केली लूटपाट

दरोडा पडल्यानंतर काही चोरीला गेले आहे का किंवा रेल्वेतील प्रवाशी अजून कोणी जखमी आहे का याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. देवगिरी एक्स्प्रेसवर ज्यावेळी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ होती.

    औरंगाबाद : जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सिग्नलला कापड बांधून रेल्वेवर आठ ते दहा जणांनी दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांनी दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन, इतर काही वस्तू लंपास करण्यात आले आहे.

    रेल्वेच्या S 5 ते S 9 या डब्यांबर दगडफेक करुन दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी ॲम्बुलन्स उभी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांना मिळत आहे. 5 एप्रिल रोजीही नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांतून भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे थांबवून दरोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. यावेळी रेल्वेवर प्रचंड दगडफेकही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रेल्वेवर मध्यरात्री दरोडा आणि दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

    रेल्वे पोलिसांकडून चौकशी
    याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मात्र अजून सविस्तर माहिती देण्यात आली नाही. दरोडा पडल्यानंतर काही चोरीला गेले आहे का किंवा रेल्वेतील प्रवाशी अजून कोणी जखमी आहे का याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. देवगिरी एक्स्प्रेसवर ज्यावेळी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ होती.

    रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नला कापड बांधून रेल्वे थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रेल्वेच्या 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत प्रचंड दगडफेक करण्यात आली. यामध्ये कोणी जखमी झाले आहे का याची चौकशी सुरु असून घटनास्थळी औरंगाबाद रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

    देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडी. सिग्नलला कापड बांधून रेल्वेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. दरोडेखोरांनी रेल्वेवर तुफान दगडफेकही केली. 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. सध्य या बाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.