५ वर्षीय बालिकेच्या खुनाने जालना हादरलं, सख्ख्या चुलत बहिणीने केली हत्या

पूजाचे आई - वडील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे राहतात. शिकण्यासाठी आई - वडिलांनी तिला जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणाऱ्या काकांकडे पाठविले होते. काही दिवसांपूर्वीच तिचा घराजवळच असलेल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश झाला होता. तिचे काका - काकू तिला दररोज शाळेत सोडत होते.

    जालना – काकांकडे शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना जालना शहरातील चौधरीनगर परिसरात सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ माजली असून या घटनेनंतर पोलिसांकडून वेगाने तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहेत.

    पल्लवी (नाव बदलले आहे), (वय ५, मुळ रा. गुंज, ह. मु. जालना, चौधरीनगर) ही जालन्यातील चौधरीनगर येथील काकांकडे शिक्षण घेत होती. तिच्याच काकांची १४ वर्षीय मुलगी पायल (नाव बदलले आहे) हीच्या हातून खून झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर मृत पूजाच्या काकूने जालना येथील तालुका पोलिस ठाण्यात त्यांचीच मुलगी कोमल हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

    पूजाचे आई – वडील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे राहतात. शिकण्यासाठी आई – वडिलांनी तिला जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणाऱ्या काकांकडे पाठविले होते. काही दिवसांपूर्वीच तिचा घराजवळच असलेल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश झाला होता. तिचे काका – काकू तिला दररोज शाळेत सोडत होते.

    सोमवारी सकाळी पूजाचे काका घनसावंगी येथे गेले होते. घरी काकू आणि तिची १४ वर्षांची चुलत बहिणी व एक लहान मुलगा होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पूजा अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, त्यावेळी पूजाची काकू स्वयंपाक करीत होत्या. इतक्यात पूजाची चुलत बहिणी बाथरूममध्ये गेली. तिने आतून कडी लावून पूजाच्या चेहरावर, मानेवर, हातावर व गळ्यावर ब्लेडने वार केले.