9 bogus TET heroes found in Gondia, two took advantage of government jobs

२०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील ९ बोगस प्रमाणपत्रधारकांची ओळख पटली आहे. त्यातील दोघांनी शासकीय नोकरीचा लाभ देखील घेतला आहे. बोगस प्रमाणपत्र धारकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून तशी तयारी सुरू करण्यात आली आहे.

  गोंदिया : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा (Teacher Eligibility Test (TET) scam) प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Examination Council )मोठी कारवाई केली आहे. परीक्षा परिषदेने यासाठी परिपत्रक काढत कारवाईचे आदेश दिले आहेत. गैरप्रकाराच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. परीक्षेत जवळपास ७ हजार ८८० उमेदवार हे बोगस आढळले. २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील ९ बोगस प्रमाणपत्रधारकांची ओळख पटली आहे. त्यातील दोघांनी शासकीय नोकरीचा लाभ देखील घेतला आहे. बोगस प्रमाणपत्र धारकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून तशी तयारी सुरू करण्यात आली आहे.

  २०१९- २०२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला. या तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये तब्बल ७ हजार ८८० उमेदवार गैरप्रकारात सहभागी होते. आता या सर्व शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना घरी पाठवले जाणार आहे.

  या शिक्षकांची यादी देखील परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर आल्या होत्या. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७८८० परीक्षार्थीना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होत. या उमेदवारांबाबत परीक्षा परिषदेने मोठी कारवाई केली आहे. या ७८८० उमेदवारांमधील २९३ उमेदवारांनी जी बनावट प्रमाणपत्र तयार केली होती आणि ते आज सेवेत आहे.

  अशा उमेदवारांना बडतर्फ (Dismiss of candidates) करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानांचे पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे देवून प्रमाणपत्र घेतलेले गोंदिया जिल्ह्यातील ९ जणांचा (9 member from Gondia district) समावेश आहे. त्यातील दोघे जण शिक्षक म्हणून नोकरीवर देखील लागलेले आहेत. तर उर्वरित ७ जणांकडे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आहे.

  ही आहेत नावे

  २०१९-२० या शैक्षणिक सत्रात पैसे देवून जिल्ह्यातील नऊ जणांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविले. त्यातील दोघांनी शिक्षक म्हणून नोकरी देखील मिळविली. ज्या ९ जणांची नावे महाराष्ट्र परीक्षा मंडळाने जाहीर केली आहेत, त्यांच्यामध्ये रागिनी ताराचंद फेंडारकर, नेहा घनश्याम सोनवणे, महेंद्र भरतलाल मेळे, नम्रता देवराम मालाधारी, पूनम विलास ठवरे, झेबा अंजूम मोहम्मद नईम शेख, सुरेंद्र संतोषदास नागपुरे आणि दुर्गेश शिवालय लिल्हारे यांचा समावेश आहे.