उजनी धरणात ९१ टीएमसी पाणीसाठा ; ७ धरणातून १४ हजार७५८ क्यूसेक्स विसर्ग येतोय उजनीत!

संपूर्ण पावसाळ्यात दगा दिलेल्या पावसाने मागील आठवडयापासुन पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात दमदार हजेरी लावल्यानंतर व भीमा खोऱ्यातील बहुतांशी धरणे भरली असून, उजनी धरणात बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग मागील आठ दिवसांत आला आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये बुधवारी (ता. ४) सकाळी ५२.२२% टक्के इतका पाणीसाठा पाणीसाठा झाला असून धरणामध्ये ९१.६४ टी एम सी पाणी जमा झाले आहे. तर पन्नाशी पार करून १०० टक्के भरण्यासाठी दिशेने प्रवास सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

  टेंभुर्णी :  संपूर्ण पावसाळ्यात दगा दिलेल्या पावसाने मागील आठवडयापासुन पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात दमदार हजेरी लावल्यानंतर व भीमा खोऱ्यातील बहुतांशी धरणे भरली असून, उजनी धरणात बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग मागील आठ दिवसांत आला आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये बुधवारी (ता. ४) सकाळी ५२.२२% टक्के इतका पाणीसाठा पाणीसाठा झाला असून धरणामध्ये ९१.६४ टी एम सी पाणी जमा झाले आहे. तर पन्नाशी पार करून १०० टक्के भरण्यासाठी दिशेने प्रवास सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

  उजनीच्या वरील पाणलोट क्षेत्रात असलेल्या १९ धरणापैकी १४ धरणे १०० टक्के असून असुन जादा झालेले पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.जसजसा पाऊस वाढत जाईल तसतसे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने इथुन पुढे उजनीत येणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये दौंड येथून वाढलेला विसर्ग कमी होवु लागला आहे आणि बंडगार्डन येथून येणारा विसर्ग मध्ये वरचेवर कमी होताना दिसत आहे सध्या खालील 7 धरणातुन विसर्ग सोडला आहे.

  चालू वर्षी जुलै महिन्यापासून उजनी धरण क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून कमी पाऊस होत होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये नियमित वाढ झाली नाही. १आँगस्ट रोजी धरण प्लसमध्ये आले होते. त्यानंतर ६४ दिवसांत धरणातील पाणीसाठा ५२.२२ टक्के झाला आहे.

  उजनी धरणावर पुणे, अ.नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे या धरणाच्या पाणीसाठ्यावर लक्ष असते. १आँगस्ट
  धरण प्लसमध्ये आल्यानंतर व त्यानंतर धरणातील पाण्यामध्ये अनियमितवाढ होत राहिली. सध्या धरणातील पाण्यामध्ये चांगली वाढ होत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

  उजनी धरण पाणीपातळी

  बुधवार दि.०४आक्टोबर २०२३ सकाळी ६ वा.चा रिपोर्ट

  पाणी पातळी….. ४९४.४४० मीटर एकूण साठा….२५९५.१३ दलघनमीटर

  ९१.६४ टी एम सी।

  ‘उपयुक्त साठा ।… ७९२.३२ दलघनमीटर

  …..२७.९८ टीएमसी टक्केवारी …..५२.२२% टक्के

  दौंड येथून जलाशयात येणारा विसर्ग

  १४ हजार७५८ क्यूसेक्स

  धरणातून इतर सोडलेला विसर्ग.

  सीना-माढा सिंचन योजना…२२२ क्युसेक्स

  …..दहीगाव सिंचन योजना…….८० क्युसेक्स … सांडवा, कालवा, बोगदा, वीज निर्मिती बंद