प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहरातील गंज बाजारातील (Gondia Crime) पान लाइन परिसरातील ओम ट्रेडर्स शॉप येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून 96 हजार 29 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला.

    गोंदिया : शहरातील गंज बाजारातील (Gondia Crime) पान लाइन परिसरातील ओम ट्रेडर्स शॉप येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून 96 हजार 29 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. ही कारवाई करण्यात आल्यानंतर याप्रकरणी दोन जणांवर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

    शहरातील माता मंदिर चौक, हेमू कॉलोनी येथील महेश रमेशकुमार ठकरानी यांचे गंज बाजार परिसरातील पान लाईन भागात ओम ट्रेडर्स शॉप असे दुकान असून, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांच्या दुकानाची तपासणी केली असता पानबहारचे 84 नग पाकिट, राजश्री पान मसालाचे 10 पाकिट, पाऊच असलेले 36 नग, राजश्री पान मसाला लाल पाकिट 46 नग, राजश्री पान मसाला निळा पाकिट 36 नग, जनम प्रीमियम टोबॅकोचे 7 पाकिट, जाफरानी जगचे 13 पाकिट, सुगंधी तंबाखूचे 49 पाकिट.

    सुगंधी तंबाखू 200 ग्रॅमचे 49 पाकिट, पान पसंद मसाला 30 पाऊच असलेले 21 नग, सीता पान मसाला 63 पाकिट, सुगंधी तंबाखू आर गोल्डचे 5 पाकिट असा एकूण 96 हजार 29 रुपये किमतीचा माल जप्त केला.