मजुराच्या खात्यात जमा झाले ९९ कोटी अन्…

सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन किंवा डिजिटल केले जातात. या ऑनलाइन व्यवहारामुळे मजुराच्या बँक खात्यात ‘गुगल पे’द्वारे तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली.

    चंद्रपूर – जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका मजुराच्या बँक खात्यात ‘गुगल पे’ द्वारे तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला आहे.

    सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन किंवा डिजिटल केले जातात. या ऑनलाइन व्यवहारामुळे मजुराच्या बँक खात्यात ‘गुगल पे’द्वारे तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ही घटना चर्चेचा विषय आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा मोबाइलवरील संदेश पाहून मजुरासह गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात ज्या खात्यातून आले होते त्याच खात्यात बँकेच्या माध्यमातून पैसे परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

    नागभीड तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवरा मेश्राम (४०) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्याचे बँक ऑफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेत खाते असून, त्याच्या या बँक खात्यात ‘गुगल पे’ च्या माध्यमातून ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा झाले. तसा संदेश बँकेकडून त्याच्या मोबाइलवर आला.