99 thousand online fraud through quick support app by sbi customer care support

तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने बोलतोय असे म्हणून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादीला संपूर्ण माहिती ॲप मध्ये भरण्यास लावली. याच दरम्यान फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड (Credit card) मधून संबंधिताने ९९ हजार ४२१ रुपये ऑनलाइन परस्पर ट्रांसपर करून फसवणूक केली.

    यवतमाळ : क्विक सपोर्ट ऍप डाऊनलोड (Quick Support App Download ) करण्यास सांगून एकाची क्रेडिट कार्ड मधून ९९ हजार ४२१ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक (Online fraud) करण्यात आली. ही घटना २८ जुलैला पिंपळगाव परिसरातील सुरभी नगर येथे उघडकीस आली.

    अमित हरिदास जाधव (रा. सुरभी नगर ) यवतमाळ असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी घरी असताना एसबीआय कस्टमर केअर (SBI Customer Care) मधून बोलतोय असे म्हणून एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने बोलतोय असे म्हणून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादीला संपूर्ण माहिती ॲप मध्ये भरण्यास लावली.

    याच दरम्यान फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड (Credit card) मधून संबंधिताने ९९ हजार ४२१ रुपये ऑनलाइन परस्पर ट्रांसपर करून काढून फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच त्यांनी लोहारा पोलीस ठाणे (Lohara Police Station) गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारका विरोधात गुन्हा दाखल केला.