A 13-year-old boy drowned in the city council's swimming pool

नगर परिषदेच्या स्विमिंग पूल (जलतरण तलाव ) मध्ये गार्ड व प्रशिक्षक असतांना ही घटना घडलीच कशी ? याचा अर्थ मुलगा पाण्यात बुडत असतांना  त्या ठिकाणी कर्तव्यावर गार्ड किंवा प्रशिक्षण नव्हतेच का ? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

    उमरखेड : येथील नगर परिषदेच्या (Municipal Council ) स्विमिंग पूल (Swimming pool ) मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय बालकाचा (13-year-old boy) पाण्यात बुडून मृत्यू (Death by drowning) झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेच्या मिळालेल्या माहिती प्रमाणे, उमरखेड येथे नगर परिषदेच्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्या करीत बालक – बालिका तरुण वर्ग जात असता दिनांक २५ जून रोजी २०२२ शनिवारी उमरखेड येथील शेख बिलाल मुनाफ कुरेशी (१३) वर्षे हा बालक दुपारी १ ते २ वाजता च्या दरम्यान सदर स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

    या  घटनेस जबाबदार कोण ?

    नगर परिषदेच्या स्विमिंग पूल (जलतरण तलाव ) मध्ये गार्ड व प्रशिक्षक असतांना ही घटना घडलीच कशी ? याचा अर्थ मुलगा पाण्यात बुडत असतांना  त्या ठिकाणी कर्तव्यावर गार्ड किंवा प्रशिक्षण नव्हतेच का ? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. नियमानुसार विचार केला असता प्रशिक्षक उपस्थित असणे गरजेचेच आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी (Chief of the Municipal Council ) दोषींवर काय कारवाई करणार ह्यावर सर्वांचे लक्ष आहे.