व्हॉट्सऍपवर ‘Today Finish’ लिहून 16 वर्षीय तरूणीची आत्महत्या; रेल्वेसमोर उडी घेत संपवले जीवन

निक कुथे पाटील कॉन्व्हेंट येथे अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वडसा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.

    देसाईगंज : स्थानिक कुथे पाटील कॉन्व्हेंट येथे अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वडसा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या (Young Girl Suicide) केली. ही घटना बुधवारी (दि.22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

    जान्हवी राजकुमार मेश्राम (वय 16, रा. भगतसिंग वॉर्ड, देसाईगंज (वडसा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. जान्हवीला आज तिचे वडील राजकुमार मेश्राम यांनी कॉलेजला सोडले होते. मात्र, काही वेळातच रेल्वे अपघातात मुलगी मृत्यू पावल्याची माहिती त्यांना मिळाली.

    विशेष म्हणजे, जान्हवीने आज सकाळीच आपल्या व्हॉट्सऍपच्या स्टेटसवर ‘टुडे फिनिश’ लिहिले असल्याचे तिच्या मैत्रिणींना स्टेटस बघितल्यानंतर कळले. पण जान्हवीने आत्महत्या नेमकी का केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.