suicide

सासरच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली. ही घटना शिंगवे (ता.आंबेगाव ) सोमवारी (दि.९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

    पारगाव शिंगवे : सासरच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली. ही घटना शिंगवे (ता.आंबेगाव ) सोमवारी (दि.९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सबुरी दिनेश गाढवे (वय २५, रा. शिंगवे, गोरडेमळा ता. आंबेगाव, जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    या घटनेची फिर्याद सुरेश गुलाब वाळुंज (वय ४५, रा. नांदुर ता. आंबेगाव) यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पती दिनेश अशोक गाढवे, अलका अशोक गाढवे, गणेश अशोक गाढवे, हर्षदा गणेश गाढवे (सर्व रा. शिंगवे गोरडेमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवे येथील गोरडे मळा येथे फिर्यादी सुरेश वाळुंज यांची मुलगी सबुरी दिनेश गाढवे ही तिच्या सासरी नांदत असताना यातील आरोपी यांनी वारंवार प्रापंचिक व माहेरून वापरासाठी व गाडी आणण्यासाठी पैसे आणण्याचे कारणावरून मुलगी सबुरी हिला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली.

    मुलगी सबुरी हिला सासरी त्रास होऊ नये म्हणून फिर्यादी यांनी वेळोवेळी १ लाख ८५ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. तरी देखील मुलगी सबुरी हिचे सासरच्या लोकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलगी सबुरी गाढवे हिने तिच्या राहत्या घरातील छताला साडीने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे.