बुलढाण्यात ४० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या

श्रीकृष्ण दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे सदर व्यक्ती हा बोथरा हॉस्पिटलकडून जुना गावकडे पायी जात असताना त्याच्या पाठीमागून दोन गाड्या जातांना दिसत आहेत.

    बुलढाणा – एका चाळीस वर्षीय व्यक्तीची अज्ञाताने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुलढाणा शहरातील शिवाजी विद्यालया जवळील डॉक्टर वाघ यांच्या दवाखान्यासमोर ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. संतोष उर्फ बाल्या दत्तात्रय जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बुलढाणा शहरातील जुना गाव येथील सत्यनारायण मंदिराजवळ राहत होता.

    श्रीकृष्ण दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे सदर व्यक्ती हा बोथरा हॉस्पिटलकडून जुना गावकडे पायी जात असताना त्याच्या पाठीमागून दोन गाड्या जातांना दिसत आहेत. त्यातील एका स्कुटीवर सिंगल सीट असलेल्या गाडीवरील इसमाने धारदार शस्त्राने संतोष जाधव याच्या गळ्यावर वार केला, दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीकक्षक निलेश लोधी करत आहेत.