
अंबड तालुक्यातील एकनाथनगर वस्तीमध्ये राहणारे पंढरीनाथ लटपटे हे झाडाखाली झोपलेले असताना शेजारीण बाईने कचरा आणून टाकला. त्यामुळे बाबांनी कचरा टाकू नका असे म्हटल्याचा राग धरून शेजारी महिलेच्या नातेवाईकांनी म्हाताऱ्या बाबांना कुऱ्हाड, रॉड, लठ्याकाठ्याने मारहाण सुरू केली. त्यात त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत.
जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील एकनाथनगर वस्तीमध्ये राहणारे पंढरीनाथ लटपटे हे झाडाखाली झोपलेले असताना शेजारीण बाईने कचरा आणून टाकला. त्यामुळे बाबांनी कचरा टाकू नका असे म्हटल्याचा राग धरून शेजारी महिलेच्या नातेवाईकांनी म्हाताऱ्या बाबांना कुऱ्हाड, रॉड, लठ्याकाठ्याने मारहाण सुरू केली. त्यात त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. उजव्या पायाची पण हाडे तोडली. या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पंढरीनाथ लटपटे यांना रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत अगोदर वडिगोद्री, त्या नंतर अंबड येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे. तिथे प्राथमिक उपचार करून पायाच्या जखमेवर टाके घालून त्यांना जालना येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले आहे. दोन दिवस होऊनही योग्य उपचार झाले नसल्याने, त्यांना खूप लागलेलं असल्याने योग्य उपचारासाठी व ऑपरेशन च्या अनुषंगाने त्यांना जालना शहरातील दीपक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आज तिसऱ्या दिवशी पंढरीनाथ लटपटेंच्या मुलांनी,सूनेनी त्यांना जालना शहरातील दीपक हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. एका वृध्द व्यक्तीला बेदम मारहाण झाल्यावर त्यांचे हाल संपले नाही. अंबड रुग्णालयात त्यांच्या पायावर टाके टाकून त्यांना जालन्याला पाठवण्यात आले. जालन्याच्या रुग्णालयात 2 दिवस त्यांच्यावर जुजबी उपचार झाले पण त्यांना खुपार असून इथे उपचार होणार नाही तुम्ही खाजगी दवाखान्यात घेऊन जा असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान पंढरीनाथ लटपटे यांना जालन्यातील खासगी रुग्णालयात भरती केल्याचे त्यांच्या सुनेने सांगितले आहे. अंगावर कपडे नाही, उपचारांचा पत्ता नाही अशी बिकट परिस्थिती झाल्याने सगळे कुटुंब हवालदिल झाले आहे. शिवाय दहशती खाली राहत आहेत.