Fraud

गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेकडून एकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी एकाने जिल्हा पोलिसप्रमुखांकडे दाद मागितली आहे.

  गगनबावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेकडून एकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी एकाने जिल्हा पोलिसप्रमुखांकडे दाद मागितली आहे.

  आसळज (ता.गगनबावडा) येथील किसन रखमाजी कांबळे या व्यक्तीने साळवण येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेकडुन ८ ऑगस्ट २००२ रोजी एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कांबळे यांनी वेळोवेळी आपली रक्कम पूर्णतः भरली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित पतसंस्थेकडे कर्ज पूर्णपणे नील झाल्याचा दाखला पतसंस्थेकडे मागितला असता या संस्थेने दाखला देण्यास टाळाटाळ केली.

  १८ जून रोजी किसन कांबळे यांनी संस्थेकडे कर्ज नीलचा दाखला पुन्हा मागितला असता तुम्हाला दाखला देण्यात येणार नाही. तुमच्या एक लाखाचे आता 27 लाख 53 हजार 407 रुपये व्याज झाले असून, मुद्दलासह एकुण 28 लाख 66 हजार 164 इतकी रक्कम झाली आहे, असे म्हणत पतसंस्था पदाधिकारी व वरिष्ठांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचे व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे किसन कांबळे यांनी सांगितले व तशा प्रकारची तक्रार जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केली आहे.

  गगनबावडा तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळवण येथील कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या या अजब कारभारामुळे व्यापारी वर्गात व सामान्य नागरिकात पतसंस्थेविषयी संभ्रम निर्माण झाला असून, ठिकठिकाणी या घटनेची कुजबुज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

  …तर आठ दिवसांत आत्मदहन करणार

  कोडोली नागरी सहकारी पतसंस्थेकडे मी दाद मागितली असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. मला जातीवाचक शिवीगाळ केली. २००२ मध्ये एक लाख रुपये कर्ज घेतले असता त्याचे 28 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर याची तडजोड झाल्यानंतर एक लाख रुपये भरून प्रकरण मिटवायचे ठरवले. एक लाख रुपये भरून नील दाखलाही दिला. परंतु, त्यांच्याकडून मी लेखी मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जर माझ्यावर झालेला अन्याय दूर नाही झाला तर मी आठ दिवसात आत्मदहन करीन, असे ते म्हणाले.

  – किसन सखाराम कांबळे