A big blast from Eknath Shinde referring to Uddhav Thackeray's letter, read in detail

आता सध्या कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेकडून 50 कोटी दिल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

  कोल्हापूर : कोल्हापूरमधील महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके एकदम ओके अशी टीका केली. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटी मागितल्याच्या एका पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नेमकं कोणी पाठवलं होतं? आणि पत्रात नेमकं काय म्हटलं होतं? याबाबत एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे भाष्य केले आहे.

  काय म्हणाले एकनाथ शिंदे?
  आमच्यावर फक्त आरोपच आरोप करण्यात आले आहेत, असा आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का पन्नास खोके 50 खोके सर्व नेते मंडळींसमोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. “आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली धडकी भरली. तुमची आम्हाला संपत्ती नको, ‘बाळासाहेब हीच आमची संपत्ती’ आहे. धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हाला मिळाले पाहिजेत, असे पत्र आम्हाला पाठवले. यांना बाळासाहेबांची विचार नको त्यांना 50 कोटी देऊन टाकले. 50 कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तरी मनाची पाहिजे होती रोज तुम्ही कसे आरोप करताय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  आता मातोश्री उदास

  तुमच्यावर आलेली संकटे मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

  शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी

  दरम्यान, ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकले. ही शिवसेना कार्यकर्ते आहेत अशी कार्यकर्ते किती आहेत, जेलमध्ये गेलेलो शिवसेना अशीच मोठी झाली नाही रक्ताचे पाणी केले लोकांनी, घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रांगोळी काही नीट मारता आले नाही तुम्हाला असा कुठला पक्ष प्रमुख असतो का, त्याचा पाणउतार करायचा असतो का? मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचे काम तुम्ही केले. कदमांचा मनोहरपंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे असतील त्यांनी काय मागितले होते तुम्हाला यांचा त्रास होता, असा सवाल करीत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.