सर्वसामान्यांना मोठा झटका, खाद्य तेलाच्या दरात वाढ

    सध्या बाजारात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. घरोघरी दिवाळीचा फराळ तयार केला जात आहे. अशामध्ये आधीच महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ  झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

     

    खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी 18 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागच्या काही महिन्यांत खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतरही ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन दिवाळीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. सध्या सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे.

    दिवाळीमुळे खाद्यतेलाच्या मागणीमध्ये किमान 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 किलो डब्यांच्या दरात 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळी फरार घरी तयार करण्यापेक्षा बाहेरुन म्हणजेच मिठाईच्या दुकानातून खरेदी करण्याचा लोकांचा कल वाढला आहे. आता या सर्वांना हा फराळ खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.