मध्य रेल्वेकडून घेण्यात आला मोठा निर्णाय, या निर्णयामुळे वाढणार रेल्वेचा वेग

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे अनेक लोकांचा रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू होतो. अनेक मेल गाड्यांच्या खाली जनावरे आल्याने त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू होतो.

  मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे अनेक लोकांचा रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू होतो. अनेक मेल गाड्यांच्या खाली जनावरे आल्याने त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू होतो. मात्र हे सर्व प्रकार थांबण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे गाड्या ११० ते १३० किमी ताशी वेगाने चालण्यासाठी आणि अपघात थांबण्यासाठी मध्य रेल्वेने १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण (Security fence) लावण्याचा निर्णय घेतला आहे. १२८२ पैकी ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर हे सुरक्षा कुंपण उभारले जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या संख्येत वाढ होणार आहे.

  गावाच्या ठिकाणी अनेकदा रेल्वे रुळावरून जाताना जनावरांचा मृत्यू होतो. तसेच रेल्वेने फिरणारे हजारो प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वेने दररोज प्रवास करत असतात. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मागील काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनमुळे अनेक जनावरांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त होण्यासाठी आणि मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेग वाढविण्याकरिता मध्य रेल्वेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ४ हजार २२६ किलोमीटर रेल्वे मार्गवर सुरक्षा कुंपण लावले जाणार आहे. हे काम लवकरच सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे.

  रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत उभारली जाणार

  १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी ६४२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. रेल्वेने होणारे अपघात टाळण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले जाणार आहे. मात्र अजूनही रेल्वे अपघाताचे प्रमाण अजून कमी झालेले नाही. सुरक्षा कुपन बांधून शून्य अपघाताचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे.

  मरेवर १२८२ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारले जाणार
  मुंबईत ४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण
  सुरक्षा कुंपण उभारण्यासाठी ६२४ कोटींचा खर्च
  एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन

  सुरक्षा कुंपणामुळे काय फायदे होणार

  मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणार.
  रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना आळा बसणार.
  रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबणार.
  रेल्वे रुळावर कचरा टाकता येणार नाही.