परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड; शरद पवारांचे निकटवर्तीय आमदार शिंदे गटात जाणार? कोण आहेत आमदार?

परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे.

    परभणी : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाची (Shinde Group) घौडदौड सुरु आहे. ठाकरे गटातील (Thackery group) अनेक आमदार, खासदार शिंदे गटात आल्यानतर आता पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. दरम्यान, मविआतील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करताहेत. आता परभणीत राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधील बाबाजानी दुर्राणी हे आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच आमदार बाबाजानी दुर्राणी हे ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खूप जवळचे मानले जातात.

    दरम्यान, परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. परभणी जिल्ह्यामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्या असून, एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेच आता शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा, खुलासा सईद खान यांच्याकडून करण्यात आला आहे.

    शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर, परभणी जिल्ह्यातील एकूण राजकीय वातावरण तापले आहे. दावे आणि प्रति दावे रोजच्या रोज केले जातात, परंतु यातून नेमकं काय तथ्य बाहेर येत हे येणाऱ्या काळात समजेल. सईद खान यांच्या या खुलासानंतर परभणीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शरद पवारांचे निकटवर्ती असलेले बाबाजानी यांचे नाव पुढे आल्याने, सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु आपण शरद पवार यांचे समर्थक असून कायम त्यांच्याकडेच राहणार असल्याचा दावा बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.