A bike rider was killed in a collision with an unknown truck

या अपघातात दुचाकीस्वार नंदकिशोर भिका राठोड (रा. आरेगाव ता. पुसद  (Pusad)  हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने चांडस येथील पोलीस पाटील विजय पांडे, पोलीस मित्र गुलाब पठाण व गावातील इतर लोकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून सदर वाहनाने उपचारासाठी वाशीमला (Washim) हलविले. उपचारादरम्यान नंदकिशोर राठोड (Nandkishore Rathore ) यांची प्राणज्योत मालवली.

    शिरपूर जैन : शिरपूर पोलीस स्टेशन (Shirpur Police Station) अंतर्गत येणाऱ्या चांडस ते कळमगव्हाण (Chandas to Kalamagvan ) रोडवर अज्ञात ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी घडली. शिरपूर पोलीस सुत्रांकडून या अपघाताबाबत प्राप्त माहितीनुसार, चांडस ते कळमगव्हाण रोडवरील समृद्धी गार्डन हॉटेलजवळ दुचाकीस्वार एम. एच. २९ बीएस ९९११ या क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करीत असताना अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला (Bike rider hit by truck) मागून जबर धडक (Hit hard) देवून चिरडले.

    या अपघातात दुचाकीस्वार नंदकिशोर भिका राठोड (रा. आरेगाव ता. पुसद  (Pusad)  हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने चांडस येथील पोलीस पाटील विजय पांडे, पोलीस मित्र गुलाब पठाण व गावातील इतर लोकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून सदर वाहनाने उपचारासाठी वाशीमला (Washim) हलविले. उपचारादरम्यान नंदकिशोर राठोड (Nandkishore Rathore ) यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनरचे संतोष पाईकराव, कुलदीप ताजणे, अमोल घायाळ, चालक शकील पठाण यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेवून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. शिरपूर पोलीस त्या अज्ञात ट्रकचालकाचा कसून शोध घेत आहेत.