मुंबई व उपनगरात धुक्याची चादर; आजार वाढण्याची शक्यता, आरोग्यतज्ज्ञांचा काय सल्ला?  

मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण, डोबिंवली, बदलापूर, अंबरनाथ, ठाणे आदी शहरात हवेत धुक्याचे साम्राज्य पाहयला मिळाले. या धुक्यामुळं हवेच्या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असून, यामुळं आजार वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे

    मुंबई : सध्या मान्सून परतीच्या मार्गावर असून, पावसाने उसंत घेतली असून, आता गुलाबी थंडीचे वेध लागले आहेत. दरम्यान, राज्यात व मुंबईकर थंडीच्या प्रतिक्षेत असताना, मागील दोन-चार दिवसांपासून मुंबई व पश्चिम व मध्य उपनगरात पहाटे धुक्याची चादर पसरली असते. त्यामुळं समोरचे काहीही दिसत नाही. आजही पहाटे मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहयला मिळाले. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण, डोबिंवली, बदलापूर, अंबरनाथ, ठाणे आदी शहरात हवेत धुक्याचे साम्राज्य पाहयला मिळाले. या धुक्यामुळं हवेच्या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असून, यामुळं आजार वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. (a blanket of fog in mumbai and suburbs the possibility of disease increase what is the advice of health experts)

    हवेतील गुणवत्ता खालावली…

    दरम्यान, थंडी येण्याच्या मार्गावर असताना, पहाटे सकाळी कमालीचे धुके पाहयला मिळते. परिणामी हवेतील गुणवत्ता खालावली असल्याचं मुंबई महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून सांगण्यात आलंय. हवेतील गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्युआयहून अधिक आढळत आहे. त्यामुळं सकाळी मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांना तसेच वाहनचालकांना या धुक्याचा सामना करावा लागत आहे. वाहनचालकांना समोरचे काही दिसत नसल्यामुळं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

    हवा गुणवत्ता पातळी मोजमाप कशी करतात?
    ० ते ५० = चांगली
    ५१ ते १०० = समाधानकारक
    १०१ ते २०० = मध्यम
    २०१ ते ३०० = खराब
    ३०१ ते ४०० = अति खराब
    ४०१ ते ५०० = तीव्र