कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून घोटला पोराचा गळा ; हिवरे खून प्रकरणाचे रहस्य पोलिसांनी उलगडले

आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अशी भीती मनात रुजल्यानंतर बापाने दहा वर्षीय पोराचा गळा घोटून त्याचा खून केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडण्यात आले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    सातारा : आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अशी भीती मनात रुजल्यानंतर बापाने दहा वर्षीय पोराचा गळा घोटून त्याचा खून केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडण्यात आले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दिनांक २३ डिसेंबर रोजी हिवरे (ता. कोरेगाव) कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला आहे. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशन बरोबर समांतर तपास सुरू केला. पथकाने मयत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलामध्ये माहिती घेतली. जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली. हा गुन्हा वडिलांनी केल्याचा संशय निर्माण झाला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती. त्यानुसार हा खूनं विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळावला होता. या तपासामध्ये लक्ष्मण जगदने, प्रवीण फडतरे, राकेश खांडके, अमोल माने, अजित करणे, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, अमृत करपे, विजय निकम, संभाजी साळुंखे, अजय जाधव, वाठार पोलीस ठाण्याचे नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे, प्रतीक देशमुख यांनी सहभाग घेतला.

    चाैकशीत दिली खुनाची कबुली
    खताळ यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. खताळ यांना मानसिक दृष्ट्या आपल्याला कॅन्सर झाला आहे, अशी भीती सातावत होती. तोच त्रास आपल्या मुलाला असल्यास व आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल, या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला. वाठार पोलिसांनी खताळ याला अटक केली असून त्याला न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.