जेवणात चिकन न देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात घातली वीट

    पुणे : जेवणात चिकन न देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात चिडलेल्या पतीने वीट घातल्याची घटना घडली. घटनेत पत्नी जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात घडला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात विकास नागनाथ राठोड (वय २६, रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    विकास राठोड हा सुरक्षारक्षक म्हणून करतो काम

    याबाबत विकास याचे रघुनाथ पवार (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास राठोड हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला आहे.  दरम्यान, घरी चिकन आणले होते.

    पत्नीच्या डोक्यात जवळ पडलेली वीट मारली

    सोमवारी रात्री पत्नीने चिकनची भाजी केली. परंतु जेवणात चिकन नसल्याने चिडून त्याने पत्नीच्या डोक्यात जवळ पडलेली वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.