
बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राहूरी तालुक्यातील सडे गावात घडली. या घटनेतील अत्याचार (Rahuri Crime) करणारा काही दिवसांपूर्वी अपघातात ठार झाला असून, पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे.
राहुरी : बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राहूरी तालुक्यातील सडे गावात घडली. या घटनेतील अत्याचार (Rahuri Crime) करणारा काही दिवसांपूर्वी अपघातात ठार झाला असून, पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील पीडित तरुणी व अत्याचार करणारा मयत आरोपी हे सख्खे मावस भाऊ-बहीण आहेत. त्याने एप्रिल २०२१ पासून वेळोवेळी अत्याचार केला. तीन महिन्यांपूर्वी एका अपघातात आरोपीचा मृत्यु झाला. पीडित तरुणीचे पोट दुखत असल्याने तिला दवाखान्यात नेल्याने ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, या घटनेतील तरुण आपल्याच नात्यातील व तोही मयत झाला असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार करण्यास असमर्थता दाखवली. मात्र, या मुलीचे पोट दुखत असल्याने तिची तपासणी केली असता सदर प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत शारीरिक अत्याचराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करत आहेत.