55 lakh fraud of businessman; A case of fraud has been registered against the three

    पुणे : कमी किंमतीत जमीन घेऊन एक ते दीड वर्षांत दुप्पट भावाने विक्री करण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून केमिकल विक्री करणाऱ्याची तब्बल १ कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे.  ही घटना जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडली आहे.  विशाल अशोक चुगेरा (रा. वानवडी), शिवम बनवारीदास महंत (रा वडगाव शेरी), मनोज सरसनाथ राय (रा. पिंपरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गिरीश आव्हाड (वय ४७ रा. बाणेर रोड, औंध) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    दीड वर्षांत दुप्पट भावाने जागेची विक्री करून देण्याचे आमिष

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आव्हाड आणि मनोज राय यांची १० ते १२ वर्षापासून ओळख आहे. जुलै २०१९ मध्ये मनोज याने शिवम, विशालची ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी शिरसवाडी (ता. हवेली ) परिसरात असलेल्या प्लॉटिंगची विक्री सुरू असल्याचे सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास दीड वर्षांत दुप्पट भावाने जागेची विक्री करून देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. त्यामुळे गिरीषने २०१९ मध्ये विशालच्या बँकखात्यात १ कोटी १० लाख रूपये आरटीजीएसद्वारे जमा केले.

    मनोजला अडीच लाख रुपये दिले

    शिवमला कमिशनपोटी १७ लाख, मनोजला अडीच लाख रुपये दिले. मात्र, काही दिवसांनी गिरीशने तिघांना संपर्क केला असता, त्यांनी जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. प्लॉट खरेदीच्या नावाखाली तिन्ही आरोपींनी गिरीशकडून घेतलेले १ कोटी १० आणि कमिशन असे मिळून १ कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.