रवी राणा-बच्चू कडू वाद पोहचला शिगेला! बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार बच्चू कडू यांनी रवी राणांवर टिका करताना, खालच्या भाषेच्या वापर केला आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैयक्तिक टिका केल्याचे रवी राणा समर्थकांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला.

    अमरावती: बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि अचलपूरचे अपक्ष आमदार व माजी मंत्री बच्चू कडू (Bachu kadu) यांच्यात सध्या पन्नास खोके…व मोफत किराणा वाटपावरून वाद सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे, चक्क बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. यावर संतापलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारलाच (Shinde fadnavis government) आव्हान देत अल्टीमेटम दिला आहे. तसेच आता रवी राणा व बच्चू कडू या दोघांमधील वाद शिगेला पोहचला आहे.

    दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी रवी राणांवर टिका करताना, खालच्या भाषेच्या वापर केला आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैयक्तिक टिका केल्याचे रवी राणा समर्थकांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला. असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. दरम्यान, बच्चू कडू यांनी सुद्धा आरोप खोटे ठरले तर 50 कोटीचा दावा रवी राणा यांच्या विरोधात केला आहे.