संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? : वाचा सविस्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळावा यासाठी ट्विटरवर छायाचित्रासह पाेस्ट केली. त्याबाबत नेटीझन्सनी मुलीची ओळख जाहीर हाेत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान राऊतांवर बार्शी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळावा यासाठी ट्विटरवर छायाचित्रासह पाेस्ट केली. त्याबाबत नेटीझन्सनी मुलीची ओळख जाहीर हाेत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान राऊतांवर बार्शी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे.

संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी 18 मार्चला आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अत्याचरग्रस्त मुलीचा फोटो शेअर केलेला आहे. या आक्षेपार्ह फोटोला ट्विटरनेही सेन्सिटीव्ह कंटेटमध्ये धरले आहे. अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो त्यांनी शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत.

चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात?” असे सवाल चित्रा वाघा यांनी संजय राऊत यांना विचारला.

काय आहे प्रकरण?

बार्शी तालुक्यातील बालेवाडी येथे 5 मार्च रोजी ही घटना आहे. पारधी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संध्याकाळी शिकवणी झाल्यानंतर घरी निघाली होती. यावेळी रेल्वे गेटजवळ दोन तरुणांनी अडवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीने पालकांसह बार्शी पोलिसात तक्रार केली. त्या मुलीच्या तक्रारीमुळे आरोपींनी संध्याकाळी जाऊन तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 5 मार्च रोजी रात्री घटलेल्या या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.