पोकलेनचे भाडे मागितल्याने मारहाण; रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांची खानाव येथील सूर्योदय प्रोजेक्ट इंफ्राप्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पोकलेन भाडयाने दिले आहे. या भाडयाने दिलेल्या पोकलेनचे भाडे मागितल्याचा राग मनात धरून दि. १२ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास उसर व गेल कंपनी यांचे रस्त्यात असलेल्या वडाच्या झाडाखाली फिर्यादी उभे असताना, सूर्योदय प्रोजेक्ट इंफ्राप्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील चौघांनी तेथे येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.

    रेवदंडा : अलिबाग (Alibag) तालुक्यात उसर कंपनी (User Company) मेन गेट ते धसाडे कुणे या मुख्य रस्त्यात मध्यावर भाडयाने दिलेले पोकलेनचे भाडे (Poklen Rent) मागितल्याचा राग मनात धरून एकास चौघांनी मारहाण केली, त्यानंतर पाचव्याने रस्त्यात गाठून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार उसर येथील फिर्यादीने रेवदंडा पोलीस ठाणे (Revdanda Police Station) येथे केली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांची खानाव येथील सूर्योदय प्रोजेक्ट इंफ्राप्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पोकलेन भाडयाने दिले आहे. या भाडयाने दिलेल्या पोकलेनचे भाडे मागितल्याचा राग मनात धरून दि. १२ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास उसर व गेल कंपनी यांचे रस्त्यात असलेल्या वडाच्या झाडाखाली फिर्यादी उभे असताना, सूर्योदय प्रोजेक्ट इंफ्राप्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील चौघांनी तेथे येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.

    या तक्रारीनुसार रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल चंद्रकांत थळे हे पोलीस निरिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

    (A case has been registered at the Revdanda police station for beating Poklen Rent)