मुख्यमंत्री शिंदेंसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजयकुमार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून मिळेल तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोशाख परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ त्याच्यासोबत फोटो काढून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विजय नंदकुमार माने असे या व्यक्तीचे नाव आहे. माने याच्याविरोधात IPC ४१९-५११, ४६९, ५००, ५०१ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजयकुमार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून मिळेल तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याची खातरजमा केली असता त्यांना अशा प्रकारचा एक फोटो सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजयकुमार माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.