
दीड महिन्यांपुर्वी वाहतूक नियमन करत असताना ट्रिपल शिट पकडल्यानंतर झालेल्या वादातून एका लष्करी जवानाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला असून, त्याची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.
पुणे : दीड महिन्यांपुर्वी वाहतूक नियमन करत असताना ट्रिपल शिट पकडल्यानंतर झालेल्या वादातून एका लष्करी जवानाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला असून, त्याची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.
रमेश ढावरे (वय ३४) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव संभाजी मनगटे (वय २५, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ढावरे हे फरासखाना वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. दीड महिन्यांपुर्वी शिवाजी रोडवरील बुधवार चौकात वाहतूक निमयन करत होते. तेव्हा वैभव मनगटे हा ट्रिपलशिट जात असताना दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुचाकी अडवली. तेव्हा दंडात्मक कारवाई करताना त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ते निघून गेले.
दरम्यान, बुधवारी दीड महिन्यानंतर तो पुन्हा वैभव या परिसरात आला. रमेश हे वाहतूक नियमन करत असताना अचानक वैभव त्या ठिकाणा आला व त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रमेश हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.