डेक्कनमधील बंद फ्लॅट फोडला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

रफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी डेक्कनमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 5 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 24 ते 25 डिसेंबरला डेक्कनमधील कांचनगल्ली परिसरातील शुभम अपार्टमेंटमध्ये घडली.

    पुणे : शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी डेक्कनमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 5 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 24 ते 25 डिसेंबरला डेक्कनमधील कांचनगल्ली परिसरातील शुभम अपार्टमेंटमध्ये घडली. या प्रकरणी ओंकार हिरलेकर (वय 36 रा. डेक्कन ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

    ओंकार हे कुटूंबियासह येथे राहण्यास आहेत. ते 24 ते 25 डिसेंबर दरम्यान कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 15 हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा 5 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला.