
राज्यातील काही भागात तापमानातील पारा घसरला आहे, त्यामुळं थंडीचा पारा वाढणार आहे. त्यामुळं उत्तर भारतासह राज्यात पुढील काही दिवसात किंवा नववर्षात थंडीची हुडहुडी कायम राहणार असून, कडाक्याची थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
मुंबई– मागील चार पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे, यावर्षी थंडीचे आगमन लांबणीवर पडले आहे, त्यामुळं थंडी उशिरा राहिल असं बोललं जात आहे. सध्या दोन ते चार दिवस थंडी कमी जाणवणार आहे, परंतु काही दिवसांनंतर रात्री आणखी जास्त थंडी वाढेल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार राजस्थान, पंजाबसह उत्तर भारतातील पाच राज्यांतील सर्व शहरांत मंगळवारी शब्दश: ‘कोल्ड डे’ होता. तापमानातील चढ उतारामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात बदल होताना दिसत आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसची तयारी सुरू असतानाच आता देशामध्ये गारठा वाढणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, कमाल तापमान सरासरीहून ४.५ अंशांपर्यंत नीचांकी राहिले. परंतु आता २९ डिसेंबरपासून रात्रीचे तापमान १ ते ३ अंशांपर्यंत वाढू शकते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये दोन ते तीन दिवसांत असे दिसू शकते. नववर्षाची जय्यत तयारी सुरू असतानाच थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर राजस्थान या राज्यात या लाटेचा प्रभाव असेल. त्याचबरोबर थंड हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही या राज्यांमध्ये वर्तवला आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमानातील पारा घसरला आहे, त्यामुळं थंडीचा पारा वाढणार आहे. त्यामुळं उत्तर भारतासह राज्यात पुढील काही दिवसात किंवा नववर्षात थंडीची हुडहुडी कायम राहणार असून, कडाक्याची थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.